शिवाजी संताजी यांचे प्रतिपादन
वार्ताहर/ हलगा
शिवछत्रपतींनी रयतेच्या हितासाठी अनेक कामे केली. त्यामुळे त्यांना रयतेचा राजा म्हणतात. परंतु आता तर रयतेचे रक्षण करणारे लोकप्रतिनिधी नाहीत अनेक संकटांना आता रयतेला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा शिवछत्रपतीचा आदर्श समोर ठेऊन आजच्या लोकप्रतिनिधीने कार्य करावे, असे उद्गार शिवाजी संताजी यांनी केले. शिवप्रतिष्ठान संघटना हलगा यांच्यावतीने आयोजित किल्ला स्पर्धा बक्षिस वितरण प्रसंगी केले. नुकताच हा कार्यक्रमा शिवाजी चौक येथे झाला.
शशिकांत लोहार यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. परशराम येळ्ळूरकर यांनी शिवमूर्तीचे पूजन केले. प्रमुख पाहुणे भरमा संताजी भाऊराव दवेलतकर, महेश देवलतकर, परशराम येळ्ळूरकर, शिवाजी संताजी, बाळाराम संताजी, सुनील चौगुले, प्रमोद लाड, उपस्थित होते. यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या स्पर्धेंमध्ये प्रथम क्रमांक निवृत्ती कामाणाचे (कलानिधी गड), द्वितीय क्रमांक विनायक दंडकार (जंजीरा) तृतीय क्रमांक मारुती हणमंताचे (कोरीगड) चौथा क्रमांक करण घोरपडे (अजींक्य तारा) पाचवा सनमीत पायक्का (कोरीगड) व अनेकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. ध्येयमंत्र झाल्यानंतर शशिकांत लोहार यांनी आभार मानले. यावेळी शिवप्रतीष्ठान संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.