मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचा निर्णय : कोरोनामुळे प्रातिनिधिक स्वरुपात होणार पूजन; चित्ररथ मिरवणूक खंडित
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंतीचे हे 102 वे वर्ष आहे. गुरुवारी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. प्रत्येकाच्या मनात शिवरायांविषयी आदर आहे. त्यामुळेच बेळगावमध्ये प्रतिवषी भव्यदिव्य स्वरूपात शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. परंतु यावषीही कोरोनाचे सावट असल्याने शिवप्रेमींनी आपल्या घरामध्येच शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रापेक्षाही बेळगावमध्ये मोठय़ा प्रमाणात शिवजयंती साजरी होते. पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणुकीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत देखावे सादर होतात. ढोल-ताशांचा गजर, भगवे फेटे, भगव्या पताका, असे मंगलमय वातावरण यादिवशी असते. बेळगावमधील प्रमुख गल्ल्यांमधून शिवजयंतीची भव्य अशी मिरवणूक काढली जाते. रात्र जागवून शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर केला जातो. परंतु मागील वर्षाप्रमाणे यावषीही शिवजयंतीवर निर्बंध आले आहेत. कोरोनाचा हाहाकार वाढत असल्याने घरीच राहून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे.
यावषी कोठेही मोठय़ा कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. एकाचवेळी गर्दी होऊन संसर्ग होण्याचा धोका असल्याने प्रातिनिधिक स्वरूपात महामंडळाच्यावतीने शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन केले जाणार आहे. नागरिकांनी मात्र आपल्या घरीच शिवरायांच्या मूर्तींचे पूजन करून शिवजयंती साजरी करावी.
प्रातिनिधिक स्वरुपात शिवजयंती होणार साजरी
बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती ही पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येते. दरवषी हजारोंच्या संख्येने शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात येते. भव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. परंतु कोरोनामुळे मागील वषीप्रमाणेच यावषीदेखील साध्या पद्धतीने घरीच राहून शिवजयंती साजरी करावी लागणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात महामंडळाच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवाजी उद्यान येथे पूजन करण्यात येणार आहे.
– दीपक दळवी (अध्यक्ष-मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ)
सीमावासियांच्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम
बेळगावच्या शिवजयंतीचे यावषीचे हे 102 वे वर्ष आहे. शतकोत्तर परंपरा असलेल्या शिवजयंतीमध्ये काळानुरूप बदल घडत गेले. पूर्वी कुडची येथून आलेले गाडे काढण्याची प्रथा होती. ती प्रथा चित्ररथ मिरवणुकीपर्यंत पोहोचली. भाषावार प्रांतरचनेनंतर सीमावासियांच्या भावना व्यक्त करण्याचे एक प्रमुख माध्यम म्हणून शिवजयंतीतून देखावे सादर करण्यात येत होते. हलत्या देखाव्यांमुळे देशभरात नाव झाले. कोरोनामुळे जरी साध्या स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यात येत असली तरी पुढीलवषी भव्यदिव्य स्वरूपात पुन्हा शिवजयंती साजरी करू.
– प्रकाश मरगाळे (खजिनदार, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ)
शिवचरित्राचे वाचन करा
यावषीच्या शिवजयंतीवर कोरोनाचे सावट असल्याने शिवप्रेमींनी आपल्या कुटुंबीयांसमवेतच घरीच शिवजयंती साजरी करावी. सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यास त्याचा धोका आपल्याच बांधवांना होणार आहे. कोरोनाचा हाहाकार सुरू असून वैद्यकीय सेवा अपुऱया पडत आहेत. यामुळे घरी राहून कुटुंबीयांसमवेत शिवचरित्राचे वाचन करून शिवजयंती साजरी करावी.
– किरण गावडे (जिल्हाध्यक्ष, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान)
हिंदू धर्मियांत शिवरायांचे आदराचे स्थान
प्रत्येक हिदूंच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदराचे स्थान आहे. त्यामुळेच बेळगावमध्ये प्रतिवषी मोठय़ा उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते. परंतु यावषी कोरोनाच्या दुसऱया लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धची लढाई सध्या सर्वात महत्त्वाची आहे. यावषी शिवभक्तांनी घरीच राहून शिवजयंती साजरी करावी.
– किरण जाधव (भाजप नेते)
लोकसहभागातून होते शिवजयंती
महाराष्ट्रापेक्षाही भक्यदिव्य अशी शिवजयंती बेळगावमध्ये साजरी होते. शंभर वर्षांची परंपरा असलेली शिवजयंती लोकसहभागातून साजरी केली जात असते. बेळगावसोबतच शहापूरमध्येही चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावषीही मागील वषीप्रमाणेच शिवभक्तांना घरोघरी शिवजयंती साजरी करावी लागणार आहे.
– नेताजी जाधव(अध्यक्ष, शहापूर शिवजयंती महामंडळ)
शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात
चित्ररथांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा उद्देश मंडळांनी मागील अनेक वर्षांपासून जोपासला आहे. हे चित्ररथ पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य पुढील पिढीपर्यंत समजण्यास मदत होते. यावषी मात्र ‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ हा उपक्रम मंडळाच्यावतीने राबविला जात असून प्रत्येक शिवप्रेमीने याचा अवलंब करावा.
– सुनील जाधव(अध्यक्ष- शिवजयंती चित्ररथ महामंडळ)