कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर- महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर शाईफेक झाल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी बिंदू चौकात झालेल्या आंदोलनावेळी कर्नाटकाच्या कन्नड रक्षण वेदिकेच्या ध्वजाला जाळून टाकले. यावेळी शिवसेनेच्या वतीने कर्नाटक राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी कर्नाटकच्या कन्नड संघटनेवर निशाणा साधला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर कर्नाटकातील काही संघटनांनी शाईफेक केली. ही घटना कर्नाटक राज्य सरकार पुरस्कृत आहे असा आरोप संजय पवार यांनी केला. कर्नाटकचे असले कोणतेही कृत्य यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पवार यांनी दिला.
यावेळी,संजय पवार, विजय देवणे, विनोद खोत, अवधूत साळोखे, बबलू शेख, सुशांत देसाई, दिलीप देसाई, धनाजी यादव, कमलताई पाटील, मंजित माने, गीतांजली गायकवाड, विराज पाटील,सुरेश चौगुले, वैभव जाधव, अवदेश करंबे, पुजा शिंदे, अजय वाडकर, विशाल देवकुळे, ओमकार सोरवसे, तुषार गायकवाड, अश्विनी घोटगाळकर,स्मिता सावंत, रणजित आयरेकर, शुभम आरंडे,सुजित चव्हाण, शुभांगी पोवार उपस्थित होते.