ऑनलाईन टीम / वाशिम :
यवतमाळ-वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थावर ईडीने छापा टाकला आहे. बालाजी पार्टीकल कारखान्याच्या घोटाळ्याप्रकरणी हे छापे टाकल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर वाशिम जिह्यात ईडीने कारवाई केली आहे. या पाचही शिक्षण संस्था असून संस्थांच्या अधिकाऱयांच ईडीकडून चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वाशिमचा दौरा केला होता. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागील वर्षी 5 कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे.
यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी किरीट सोमय्या हे वाशिम दौऱयावर होते. त्यावेळ सोमय्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्याकरिता जात होते. त्यावेळी भडकलेल्या भावना गवळींच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. यावेळी सोमय्या यांच्यासोबत भाजप आमदार राजेंद्र पाटणी होते.