ऑनलाईन टीम / अमरावती :
अमरावती जिल्ह्यातील तिवसाचे शिवसेना शहर प्रमुख अमोल पाटील यांची शनिवारी रात्री निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरा 4 आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिवासा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आशीर्वाद वाईन या बारमध्ये अमोल पाटील एका मित्रासह आले होते. मात्र, बार बंद झाल्याने पाटील आणि त्याचा मित्र बारसमोर बसून दारु पित बसले होते. ही संधी साधून 5 आरोपींनी पाटील यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात पाटील यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पंचनामा करत रात्री उशिरा 4 आरोपींना अटक केली. तर 1 आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.