पुणे : राज्यातील राजकारणामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आक्रमक बनली आहे. अनेक शिवसैनिंकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. पुण्यातील कात्रज मधील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. सकाळी दहाच्या सुमारास हि तोडफोड करण्यात अली आहे. यानंतर तानाजी सावंत आणि त्यांचे कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि आणि घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. अनेक शिव सैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे.शिवेसेनचे अशातच शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यात बंडखोर आमदारांच्या विरोधात पवित्रा शिवसैनिक पवित्रा घेत असल्याचे चित्र दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यलयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थाना बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले असून तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत. तानाजी सावंत भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. २०१४ साली शिवसेना भाजपच्या सत्तेत तानाजी सावंत यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, २०१९ ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनेनं तानाजी सावंत यांनी मंत्रीपदाची संधी दिली नाही. तेव्हापासूनच तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर बंडखोरी करत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.