सावंतवाडी /प्रतिनिधी-
एक हात छोट्याशा मदतीचा या संकल्पनेतून सावंतवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या तर्फेदिव्यांग कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी सावंतवाडी तालुक्यातील 20 दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबांना जीवनोपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या. त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजय गांधी निराधार समिती सदस्य गजानन नाटेकर, आरोस सरपंच शंकर नाईक, असनिये सरपंच स्नेहल असंनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बिद्रे, संजय गावडे व लाभार्थी उपस्थित होते.