प्रतिनिधी/ सातारा
शिवसेनेच्यावतीने शहरातील मंगळवार तळे परिसरात मोजमापे करण्यात आली. शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्याची मोजमापे घेत असल्याने नेमके काय सुरु आहे याकडे सातारकर औत्सुक्याने पहात होते. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या पुढाकाराने ही मोजमापे करण्यात आली.
याबाबत माहिती देताना सचिन मोहिते म्हणाले, दोन वर्षापुर्वी माहिती अधिकारात अर्ज दिले होते. ऐतिहासीक अशा मंगळवार तळय़ाच्या शेजारी एका खाजगी बिल्डरने त्याचा बंगला बांधलेला आहे. बंगला बांधताना कसल्याही पद्धतीचे भान ठेवले नाही. अतिक्रमण केले आहे. रस्त्याचे बोळ केले आहे. रस्त्याच्या आजूबाजूची मापे घेतली तर 9 मीटर भरते आहे. मुळ रस्ता दिसेनासा झालेला आहे. बंगल्याच्या शेजारी सोडचार मीटर अंतर भरते आहे. एवढी वाईट अवस्था तळय़ावर झालेली आहे. तसेच सोन्याच्या गिरणीच्या चौकामध्ये रस्त्याची मापे 9 मीटर आहेत. परंतु सहाच मीटर रस्ता शिल्लक राहिलेला आहे. त्याच्यावर का कारवाई होत नाही हेही कळत नाही. 11 मीटर जागा असायला हवी होती. ती दिसत नाही. याच्या विरोधात शिवसेनेने वारंवार आवाज उठवून देखील सातारा नगरपालिकेचे प्रशासन झोपेचे सोंग घेवून पडलेले आहे. नगरपालिकेचे अधिकारी पाठीशी घालत आहेत. मला एकच सांगायचे आहे पालिकेच्या अधिकाऱयांना भस्म्या रोग झालेला आहे काय?, किती खाता, तरुण पिढी माफ करणार नाही. शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.