क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळुर येथे सब ज्युनियर राज्यस्तरिय बॉक्सिंग स्पर्धेत बेळगावच्या श्रवण पाटील याने सुवर्ण पदक पटकावून यश संपादन केले आहे. त्याचा शिवाजी हायस्कूल कडोलीतर्फे खास सत्कार करण्यात आला.
कडोली येथील शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थी श्रवण राजू पाटील याने नुकत्याच बेंगळुर येथे झालेल्या सबज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत 36 ते 38 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले. त्याबद्दल शिवाजी हायस्कूल कडोलीतर्फे शाळा सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष अण्णू हिरामणी कटांबळेव मुख्याध्यापक यांच्या हस्ते श्रवणचा खास सत्कार करण्यात आला. श्रवणला अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, क्रीडा शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभत आहे. त्याच्या या यशाबद्दल खास अभिनंदन होत आहे.