मोहिमेबाबत धारकऱयांशी साधणार संवाद
प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यावषी विशाळगड ते पन्हाळगड अशी मोहीम निश्चित करण्यात आली आहे. या मोहिमेविषयी जागृती करण्यासाठी शुक्रवार दि. 25 रोजी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी बेळगावमध्ये येणार आहेत. सायंकाळी 5 वाजता अनसुरकर गल्ली येथील छत्रे वाडय़ात हा कार्यक्रम होणार आहे. यावषी 28 ते 31 जानेवारीदरम्यान विशाळगड ते पन्हाळगड अशी मोहीम आखण्यात आली आहे. मोहिमेमध्ये दरवषी बेळगावमधून हजारो तरुण सहभागी होत असतात. दरवषी सहभागी होणाऱयांची संख्या वाढत आहे. मोहिमेमध्ये शिवरायांच्या विचारांबरोबरच सुवर्ण सिंहासन, खडा पहारा या विषयी जागृती होणार आहे. या संदर्भात भिडे गुरुजी तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शिवप्रतिष्ठानचे सर्व विभागप्रमुख, कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले आहे.