एकूण सक्रिय रुग्ण 1646 : 6227 अहवाल बाकी : 210 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी, वास्को
राज्यातील कोरोनाचा फैलाव वाढतच चालला आहे. काल शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला. काल 190 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 1646 झाला आहे. त्याचबरोबर 6227 चाचण्यांचे अहवाल अजून यायचे आहेत. काल 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
अन्य भागातील रुग्ण संख्याही वाढत चालली असून कोरोनाची दहशत लोकांमध्ये वाढत आहे. वास्को भागातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 385 झाली आहे तर त्यापाठोपाठ हॉटस्पॉट बनलेल्या कुठ्ठाळीतील रुग्णसंख्या 378 झाली आहे. सांखळीतील स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. सांखळीत रुग्णसंख्या 83 झाली आहे. पेडणेत रुग्णसंख्या 18, वाळपईत 7, म्हापशात 52 तर पणजीतील रुग्णांचा आकडा 46 झाला आहे. डिचोली 3, हळदोणा 3, बेतकी 9, कांदोळी 22, कासारवर्णे 18, कोलवाळ 47, खोर्ली 25 चिंबल 78, शिवोली 14, पर्वरी 23 तर मयेतील रुग्णसंख्या 3 आहे.
कुडचडेची रुग्णसंख्या 12, काणकोणची रुग्णसंख्या 6 तर मडगावची रुग्णसंख्या 92 झाली आहे. बाळ्ळीत 8, कासावलीत 9, चिंचणीत 2, कुडतरी 14, लोटली 25, मडकई 8, केपे 8, सांगे 2, शिरोडा 9 तर धारबांदोडा येथील रुग्णसंख्या 49 आहे. फोंडाची रुग्णसंख्या 47 व नावेलीची रुग्णसंख्या 20 आहे. रस्ता, रेल्वे व हवाईमार्गे आलेल्या रुग्णांची संख्या 121 आहे. होम क्वारंटाईनसाठी दोन अर्ज आले असून जिल्हाधिकाऱयांनी मान्यताही दिली आहे.
वास्कोतील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
काही आजारानिमित्त गोमेकॉमध्ये दाखल केलेल्या वाडे वास्कोतील एका वृद्ध महिलेला हृदयविकाराने मृत्यू आला. मात्र, मयत महिलेला कोरोनाचा बाधा झाली होती, हे तिच्या मृत्यूनंतर उघडकीस आले. तिच्यावर मायमोळे वास्कोतील कब्रस्थानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत वृद्ध महिला सत्तर वर्षांची होती. तिच्या अन्य आजारामुळे तिला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी तिला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आला. मृत्यूनंतर तिची कोविड चाचणी करण्यात आली असता, तिला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पूर्णपणे पालन करून शुक्रवारी संध्याकाळी तिचे दफन करण्यात आले.
404 व्यक्तींची ऍन्टीबॉडी चाचणी दरम्यान, काल शुक्रवारी मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनमध्ये 150 व्यक्तींची ऍन्टीबॉडी चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 404 व्यक्तीची ऍन्टीबॉडी चाचणी करण्यात आली आहे.