सेन्सेक्स 488 अंकांनी मजबूत : निफ्टी 17,800 च्या जवळपास
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय शेअर बाजारात घसरणीच्या सत्रानंतर पुन्हा चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी तेजीची उसळी पहावयास मिळाली आहे. जागातिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे देशातील बाजारात उत्साहाचे वातावरण परतले आहे. दिवसअखेर सेन्सेक्सने 488 अंकांची मजबूत झेप घेतली. प्रमुख कंपन्यांपैकी टायटन, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग मजबूत स्थितीत राहिले.
दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 59,677.83 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144.35 अंकांनी वधारत 0.82 टक्क्यांच्या तेजीसोबत 17,790.35 अंकांवर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये टायटनचे समभाग सर्वाधिक 10 टक्क्यांनी मजबूत झाले असून अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, एशियन पेन्ट्स, सन फार्मा, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांनी तेजीचा प्रवास केला आहे. दुसऱया बाजूला डॉ.रेड्डीज लॅब, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
विविध घडामोडींपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात तेजीचा माहोल राहिला होता. दुपारी ट्रेडिंगदरम्यान वाहन क्षेत्राचा निर्देशांक 4.5 टक्क्यांनी वधारला. सणासुदीचा कालावधी असल्याने कापडासह रियल इस्टेट क्षेत्रात तेजी राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामुळे याचा सकारात्मक लाभ हा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे शुक्रवारपासून तिमाही अहवाल सादर करण्याच्या आधीं आयटी क्षेत्र तेजीत आले. लवकरच आरबीआय पतधोरण संदर्भातील निर्णय सादर करणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. जागतिक बाजारांपैकी आशियातील हाँगकाँग, सोल आणि टोकियो लाभात राहिले तर युरोपातील मुख्य बाजार दुपारपर्यंत तेजीत राहिले होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टायटन…….. 2376
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 878
- मारुती सुझुकी 7491
- इंडसइंड बँक. 1165
- सन फार्मा…… 823
- एशियन पेन्ट्स 3287
- एचसीएल टेक 1306
- टीसीएस…… 3892
- टेक महिंद्रा… 1417
- आयसीआयसीआय 702
- बजाज ऑटो.. 3829
- इन्फोसिस…. 1691
- लार्सन ऍण्ड टुबो 1712
- टाटा स्टील… 1289
- आयटीसी……. 232
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2572
- पॉवरग्रिड कॉर्प 188
- भारती एअरटेल 692
- बजाज फायानान्स 7747
- स्टेट बँक……… 457
- टाटा मोर्ट्स…. 376
- बंधन बँक……. 328
- अशोक लेलँड… 135
- आयशर मोर्ट्स 2820
- एसीसी…….. 2266
- एचपीसीएल… 319
समभाग घसरलेल्या कंपन्या
- डॉ.रेड्डीज लॅब 4892
- एचडीएफसी. 2728
- नेस्ले………. 19049
- बजाज फिनसर्व्ह 17510
- हिंदुस्थान युनि 2671
- एनटीपीसी….. 142
- ऍक्सिस बँक…. 776
- एचडीएफसी बँक 1611
- कोटक महिंद्रा 1952
- अल्ट्राटेक सिमेंट 7356
- ओएनजीसी…. 160
- गेल…………… 159
- कोल इंडिया…. 190
- ब्रिटानिया…. 3905
- बजाज होल्डींग्स 4731