वार्ताहर / फलटण
सासवड (ता.पुरंदर) येथील अजित मल्टिस्टेट क्रेडिट सोसा., लि. सासवड (जि.पुणे) या संस्थेने एजंटामार्फत फलटण शहर व तालुक्यातील शेकडो महिलांची बचत गटांना आर्थिक मदत करण्याचे अमिष दाखवून त्यांची हजारो रूपयांची फसवणुक करून त्यांना मानसिक त्रास दिला. या विरोधात फलटण येथील शेकडो महिलांनी काल सासवड (ता.पुरंदर) येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अजित मल्टिस्टेवर कडक कारवाई करून संचालकांसह त्यांच्या एजंटावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अजित मिल्टिस्टेट सोसायटी या संस्थेने स्वत:च्या एंजटामार्फत फलटण शहर ब तालुक्यातील महिलांना बचतगटांना आर्थिक मदत करण्याचे अमिष दाखले. सोसायटीच्या अमिषाला बळी पढूल शेकडो महिलांनी बचतगट स्थापन करून कर्ज मागणी केली असता बचतगटांना आर्थिक पुरवटा न करता प्रत्येक महिलेला वयक्तिक कर्ज दिले.कर्ज वितरण करताना केवळ कोर्या कागदवर सह्या घेण्यात आल्या. 20 हजारांचे कर्ज देताना पहिला हप्ता शेअर्स, प्रोसेसिंगच्या नावाखाली कर्ज रकमेतून वजावट करून केवळ 16650/-एएवढीच रक्कम हाती दिली. यानंतर महिलांनी कर्जफेड सुरू केली मात्र हप्ते जमा केल्याच्या पावत्या कर्जाची कागदपत्रांची मागणी केली असता संस्थेचे कर्मचारी आमची अशीच पध्दत आहे आम्ही कोणालाच पावती देत नाही. अशा वक्तव्यामुळे महिलांना सोसायटीवर विश्वास न रहिल्याने महिलांनी एकरकमी कर्जाची परतफेड करून सोसायटीशी आर्थिक व्यवहार बंद केले. यानंतर जुलै 2019 मध्ये काहीच रक्कम जमा नसलेचे व कायदेशीर कारवाई करणेचे नोटीस दिले. सदर बेकायदेशीर नोटीसीस महिलांना उत्तर दिले यावर सोसायटीने कसलीही कारवाई केली नाही.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज बंद ठेवून केवळ तातडीची प्रकरणे व ती सुध्दा फक्त ऑनलाईन हेअरिंग घेणेचे निर्देश दिले. अशा परिस्थितीतच सोसायटीने बेकायदेशीर लवाद नेमणुक केली व लवादाने सुनावनीचे कोणतही नोटीस संबंधित महिलांना दिले नाही व महिलांना आपली बाजू मांडण्याची संधीही न देता उच्च न्यायालयाचा अवमान करून एकतर्फी न्यायनिर्णय दिला. सदर निर्णयानुसार सोसायटीचे वसुली अधिकार्यांनी महिलांचे बचत खाते गोठवले, त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या जुलमी प्रक्रिया सुरू केल्याने महिलांचे आर्थिक शोषण होत आहे.
बहुतांशी महिला या मोलमजुरी, शेतमजूरी, खासगी नोकरी करतात त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सोसायटीने खासगी सावकारीचा उपयोग करून मनमानी व आडदांडपणे कर्जफेड केलेल्या रकमेची अन्यायकारक वसुली सुरू केली आहे. तरी या प्रकरणी सोसायटी व लवादाची फौजदारी प्रकियेनुसार सखोल चौकशी करुन अन्यायकारक वसुली थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या मोर्चामध्ये नफिसा महात, सीमा भाटी, पुजा पालखे, आशा गजरे, हालिमा शेख, राजश्री कोटी, शीतल सूर्यवंशी, बेबी बागवान, आसमा इनामदार, जयश्री भोसले यांच्यासह शेकडे पीडित महिला सहभागी झाल्या होत्या.