प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा बँक निवडणुक आखाड्यात शेतकरी कामगार पक्ष ताकदीने उतरणार आहे. पक्षाकडून संस्था गटातील 12 जागा वगळता उर्वरीत 9 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ताकदीने लढतील. यासाठी आमच्या सोबत येणाऱया कोणत्याही पक्ष संघटनाशी अगदी भाजपसोबतही सहकार तत्वाने युती करण्याची तयारी आहे. अशी माहिती माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. या संदर्भात आज टेंबे रोड येथील शेकापच्या कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमच्या साथीने विरोधकांना धडा शिकविण्याचे काम केले
यापुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीशी जिल्हÎाच्या राजकारणातील अनेक सत्तास्थानामध्ये युती करुन निवडणूक लढविल्या. प्रमुख्याने सहकारी संस्थांमध्ये ही युती अनेक वर्षे होती. परंतु त्यांना आता दुसरा मित्र मिळाला आहे. आम्ही साथ देवून केलेल्या युतीने विरोधकांना धडा शिकविण्याचे काम केले होते. अगदी प्रामाणिक दोस्ती केली. मात्र दुसरा मित्र मिळाल्याने शेकापकडे दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप संपतबापू यांनी केला. ते म्हणाले, आम्ही आमच्या तत्वनिष्ठेशी ठाम राहून सहकार तत्वाने युती करणार आहे.
यामध्ये प्रत्येक तालुकानिहाय संस्थागटातील 12 जागावरती उमेदवारी न देता. इतर संस्था गट, प्रोसेसिंग व राखीव गट अशा एकुण 9 जागावरती सक्षम उमेदवार देवून ताकदीने लढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाबुराव कदम, केरबा भाऊ पाटील, दत्तात्रय पाटील, एकनाथ पाटील, बाबासाहेब देवकर, नामदेव पाटील, संग्राम माने, निवास साळोखे व कुमार जाधव उपस्थित होते.