ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कुंडली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत या आंदोलनादरम्यान 9 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मक्खन खान (वय 42) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील भिडेर कलान या गावचे रहिवासी होते.तीन दिवसांपूर्वी बाळकर आणि इतर साथीदारांसोबत ते कुंडलीच्या सीमेवर आले होते. सोमवारी थंडीने त्यांच्या छातीत दुखत होते. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील 19 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान टिकरी सीमेवर सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यापैकी बहुतेक जण मध्यमवयीन होते. त्यामधील एकाचा गाडीत भाजल्याने तर इतरांचा हृदयविकाराच्या झटक्याने आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. कुंडली सीमेवर तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाचा रस्ते अपघातात तर दोघांच्या हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला.