प्रतिनिधी/ बेळगाव
देवरशिगीहळ्ळी (ता. कित्तूर) येथे शेतात गांजा पिकविणाऱया तरुणाला रविवारी कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या जवळून 1 किलो 120 ग्रॅम इतक्मया गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
विजय कल्लय्या करेयण्णावर (वय 24, रा. देवरशिगीहळ्ळी) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. कित्तूरचे मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ कुसगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. बी. माविनकट्टी, रमेश गेजेर, शेखर जवळी, एल. एफ. जंबलवाडी, एच. एल. बजंत्री, आय. बी. कुजगनट्टी, बी. एफ. पत्तार, एम. एम. दय़ामनगौडर, आय. एन. जिन्नवगोळ, श्रीद्धर तिप्पण्णावर आदींनी ही कारवाई केली.