बार असोसिएशन निवडणूक होणार चुरशीने : आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस
प्रतिनिधी /बेळगाव
बार असोसिएशन निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी तब्बल 21 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. अध्यक्षपदासाठी बुधवारी ऍड. दिनेश एम. पाटील यांनी अर्ज दाखल केला असून यापूर्वी ऍड. प्रभू यतनट्टी यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे दोघांमध्ये लढत होण्याची शक्मयता आहे.
उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी 8 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. शिवपुत्र फटकळ, ऍड. व्ही. आर. कमते, ऍड. अमित कोकितकर, ऍड. बसवराज एम. मुगळी, ऍड. लक्ष्मण पाटील, ऍड. विनोद एस. पाटील, ऍड. सचिन शिवण्णावर यांनी अर्ज दाखल केले आहेत.
जनरल सेपेटरी पदासाठी एकूण सहा अर्ज दाखल झाले आहेत. ऍड. सतीश गोपाळ बिरादार, ऍड. शिवलिंगाप्पा बुदीहाळ, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. रविंद्र गुंजाळे, ऍड. षडाक्षरी हिरेमठ, ऍड. गिरीश पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. जॉईंट सेपेटरी पदासाठी एकूण पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये ऍड. बंटी कफाई, ऍड. श्रीधर कुलकर्णी, ऍड. निंगनगौडा पाटील, ऍड. विश्वनाथ सुलतानपुरी, ऍड. प्रवीण उपाध्ये यांनी अर्ज दाखल केले आहेत.
कमिटी सदस्य पदाच्या पाच जागांसाठी 13 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. ऍड. मुरलीधर भस्मे, ऍड. आय. वाय. बयाळ, ऍड. आनंद घोरपडे, ऍड. येशुनाथ गुट्टेण्णावर, ऍड. चंद्रशेखर हिरेमठ, ऍड. रमेश मोदगेकर, ऍड. सुरेश नागनुरी, ऍड. आदर्श पाटील, ऍड. महांतेश पाटील, ऍड. राकेश निंगनगौडा पाटील, ऍड. पी. के. पवार, ऍड. अभिषेक उदोसी, ऍड. विठ्ठल हुपरी यांनी अर्ज दाखल केले आहेत.
महिला प्रतिनिधीसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. ऍड. शकुंतला कांबळे, ऍड. आरती नंदी, ऍड. पूजा पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. दि. 11 रोजी अर्ज माघारचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 पर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ आहे.