साहित्यः
एक वाटी शेवया, 2 बटाटे वाफवून मॅश करून, पाव वाटी बेडक्रम्स, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, चवीपुरते मीठ, 1 चमचा लिंबूरस, तेल तळण्यासाठी
कृतीः
प्रथम भांडय़ात दोन ते तीन वाटय़ा पाणी गरम करण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात कुस्करलेल्या शेवया दोन ते तीन मिनिटे घालून निथळाव्यात. आता चाळणीत पसरवून गार होण्यास ठेवाव्यात. बाऊलमध्ये मॅश केलेले बटाटे घेऊन त्यात शेंगदाण्याचे कूट, शेवया आणि बेडक्रम्स घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ आणि लिंबूरस घालून मिश्रण मळून घ्यावे. जर मिश्रण जास्तच पातळ झाले असेल तर त्यात आणखी थोडे बेडक्रम्स घालून गोळा मळून पंधरा मिनिटे झाकूण ठेवावा. नंतर हाताला थोडेसे तेल लावून गोळा पुन्हा मळावा. त्याचे छोटे छोटे गोलाकार कटलेट बनवावेत. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तेल चांगले गरम झाले की आच मंद करून त्यात तयार कटलेट सोडून हलक्या सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढावेत. आता तयार गरमा गरम शेवया कटलेट सॉससोबत अथवा चहा-कॉफीसोबत खाण्यास द्या.