आयबीएफची माहिती : अन्य गोष्टीत सवलतीची मागणी
नवी दिल्ली :
कोरोनामुळे सध्या जगातील उद्योगधंदे आणि अन्य व्यवसाय ठप्प झाले आहेत. यामुळे टीव्ही शोचे होणारे आउटडोर शुटिंगही बंद आहे. तसेच आयपीएलचे सामनेही रद्द करण्यात आल्यामुळे विविध टिव्ही चॅनेल्सच्या जाहिरातींचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटल्या असल्याचे इंडियन ब्रॉडकास्टींग फाउंडेशन(आयबीएफ)यांनी सांगितले आहे.
आयबीएफने माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून टीव्ही चॅनेल्सना होणाऱया नुकसानीतून भरपाईसाठी योग्य ती मदत सरकारने करावी अशी मागणी आयबीएफने केली आहे. नव्या मालिकांचे चित्रीकरणच थांबले असल्याने सध्या अनेक चॅनेल्सवर जुनेच कार्यक्रम दाखवण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक चॅनेल्सना नवे काय दाखवायचे असा प्रश्न पडला आहे. जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोवर विविध जुने कार्यक्रम दाखवण्याचा पर्याय अवलंबला जात आहे. कारण सर्व प्रकारचे टीव्ही शो बंद असल्यामुळे जाहिराती 50 टक्क्मयांनी घटल्या असून यामुळे टीव्ही चॅनेल्सना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
बंदचा परिणाम
आयबीएफचे अध्यक्ष एन.पी. सिंह यांनी बोलताना, कोरोना आणि लॉकडाऊनच्या प्रभावामुळे प्रसारणात अडथळे येत आहेत. याचा परिणाम म्हणून तब्बल 50 टक्क्मयांनी टीव्ही चॅनेल्सच्या जाहिराती कमी झाल्या असल्याचे म्हटले आहे. जीएसटीमध्ये सवलत मिळण्यासह इतर मागण्या सरकारपुढे ठेवण्यात आल्या आहेत.