प्रतिनिधी /बेळगाव
वसंत व्याख्यानमालेतर्फे श्रावणातील संकष्टीचे औचित्य साधून अथर्वशीर्षाची आवर्तने करण्यात आली. आसावरी भोकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात पुरोहित पुराणिक यांनी श्री गणेश पूजन करून पौरोहित्य केले. व्याख्यानमालेच्या अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थित महिलांनी अथर्वशीर्षाची 21 आवर्तने केली. दरवषी व्याख्यानमालेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. यानंतर अर्चना बेळगुंदी, आशा कुलकर्णी, नमिता के., धनश्री नाईक यांनी भक्तीगीते सादर केली. कोविड-19 च्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.