प्रतिनिधी / म्हापसा
लायन्स क्लबचे ज्येष्ट सदस्य श्रीधर नाईक यांना वर्ष 2019-20चा ’मल्टिपल’ विभागातील ’उत्कृष्ट विभागीय अध्यक्ष’ हा पुरस्कार अलीकडेच प्राप्त झाला. इंटरनेटच्या माध्यमातून झालेल्या ’मल्टिपल डिस्ट्रिक्ट 317’च्या परिषदेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. लायन्सचे जिल्हा प्रशासक शशिंद्रन नायर यांनी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे अवलोकन केल्यानंतर ही निवड झाली आहे. श्री. नाईक हे सध्या लायन्सचे जिल्हा प्रशासक गिरीश कुच्चीनाड यांच्या नेतृत्वाखाली लायन्सचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांच्या अधिपत्याखाली लायन्सचे म्हापसा, साखळी, डिचोली, चोडण, जुने गोवे, पणजी, पर्वरी आणि आग्वाद असे आठ क्लब आहेत. सध्याच्या महामारीच्या काळातदेखील हे सर्व क्लब चांगल्यापैकी सेवाकार्य बजावत आहेत.