ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरमधील बटामालू भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून या भागात अद्याप शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली. अर्शिद अहमद खान, माजिद रसूल आणि मोहम्मद आसिफ अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिघेही पाकिस्तानी दहशतवादी फैयाज खान याच्या संपर्कात होते. फैयाज या तरुणांना आसपासच्या सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या सूचना देत असे.