प्रतिनिधी /म्हापसा
भक्तांच्या हाकेला पावणाऱया म्हणून प्रसिध्द असलेल्या म्हापसा श्री देवबोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला रविवार दि. 16 रोजी सकाळी प्रारंभ झाला. दर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गावकऱयांनी गाऱहाणे घालून व प्रसाद दिला.
कोरोना महामारी असली तरी भविक दर्शन घेण्यासाठी मागे राहिले नाहीत. श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी केली होती. पोलीस उपअधीक्षक उदय परब, पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, माजी आमदार रोहन खंवटे, जोशुआ डिसोझा, दयानंद मांद्रेकर यांनी श्रींचे दर्शन घेतले. देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी त्यांचे स्वागत केले.
आपली विविध कामे होण्यासाठी दरवर्षी भाविक श्री बोडगेश्वराकडे नवस करून साकडे घालतात. काम झाल्यावर नवस फ्sढडण्यासाठी येथे येतात. कोरोना महामारी असतानाही काही नियम पाळून भविकांनी दर्शनास गर्दी केल्याचे दिसून आले.
जत्रोत्सवाच्या फ्sढरीत कपडय़ांची, भांडय़ांची, तसेच खाद्यपदार्थ, लहान मुलांना भूरळ घालणारी अनेक खेळण्यांची, विविध रंगीबेरंगी चित्रे, चप्पल, लाकडाची विविध उपकरणे, फ्gढगे आदी दुकाने थाटली आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृध्दांना तसेच तरूणपिढीला प्रोत्साहन देणारे जायंटव्हील, मै हूं गधा, तसेच अंगावर शहारे आणारी ‘मौतकी कुआ’ यासारखे खेळ आले आहेत. राज्यातील विविध ठिकाणच्या प्रसिध्द व्यापाऱयांनी आपली लाडू, चकली, गरमा गरम खाज्याची दुकाने थाटली आहेत. सध्या थंडीचे दिवस असल्याने ब्लँकेट, रग, चादर, स्वेटर, शाल विक्रेते इतर राज्यातून आलेले दिसून येत आहेत. ही फ्sढरी पुढील रविवार पर्यंत चालणार आहे.