प्रतिनिधी /पणजी
श्री स्वामी समर्थ श्रद्धाभक्त सेवा न्यास (रजि.) च्या प्रस्तावित श्री स्वामी समर्थ मंदिराचा कोनशीला स्थापना कार्यक्रम रविवार 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्री श्री 108 महंत मठाधीश प.पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज (श्री स्वामी समर्थ मठ, माडय़ाचीवाडी-कुडाळ) यांच्या शुभहस्ते वाळकेश्वरवाडा-बेती येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, साळगावचे आमदार केदार नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुंडईकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पेन्ह-दी-फ्रान्स पंचायतीचे सरपंच स्वप्नील चोडणकर यांची खास उपस्थिती असेल. सकाळी 11.30 वाजता प.पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे प्रबोधन, दुपारी 1 वाजता महाप्रसाद होणार आहे. अधिक माहितीसाठी अमित कोरगावकर (9623827560), गिरीधर गावडे (9420162810) किंवा प्राजक्त नाईक (8390613337) यांच्याशी संपर्क साधावा. या कोनशीला समारंभाशाठी बहुसंख्य भाविकांनी उपस्थिती राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ श्रद्धाभक्त सेवा न्यास (रजि.) तर्फे करण्यात आले आहे.