ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील संक्रमित रुग्णांमध्ये सोमवारी किंचितशी घट पहायला मिळाली. काल दिवसभरात 12 हजार 286 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 91 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 11 लाख 25 हजार 527 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 248 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 48 लाख 54 हजार 136 लोकांना लस देण्यात आली आहे.
सोमवारी 12,464 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 07 लाख 98 हजार 921 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 68 हजार 358 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 21 कोटी 76 लाख 18 हजार 057 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 59 हजार 283 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.01) करण्यात आल्या.