जिल्हय़ात नव्याने 615 रूग्णांची नोंद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
संगमेश्वरातील 10 वर्षीय बालिकेचा कोरोनाने बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वात कमी वयात कोरोनाने मृत्यू ओढवल्याची ही जिल्हय़ातील पहिलीच घटना आहे. जिह्यात रविवारी कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ पहावयास मिळाली. यात मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 615 रूग्ण आढळून आले. यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 हजार 224 इतकी झाली आह़े तर 24 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिह्यात रविवारी एकूण 1 हजार 866 कोरोना चाचण्या करण्यात आल्या यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 239 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये केवळ 376 अशा एकूण 615 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 231, दापोली 24, खेड 28, गुहागर 140, चिपळूण 52, संगमेश्वर 76, मंडणगड 00, लांजा 24 व राजापूर 40 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 19 हजार 224 इतकी झाली आह़े
मागील 24 तासात 37 रूग्ण बरे होवून घरी सोडण्यात आल़े यामुळे बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 76 इतकी आह़े तर जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 68.01 इतके आह़े तर जिह्यामध्ये नव्याने 24 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी यामध्ये मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 4, संगमेश्वर तालुक्यातील 4, लांजा 3, चिपळूण 5, राजापूर 4 व दापोली येथील 4 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार रत्नागिरी 141, खेड 78, गुहागर 23, दापोली 61, चिपळूण 122, संगमेश्वर 86, लांजा 25, राजापूर 34, मंडणगड 6 अशी नोंद आहे. जिह्यातील एकूण मृतांची संख्या 576 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 2.99 इतका आह़े
बालिकेच्या मृत्यूचे कारण शोधणार
संगमेश्वरातील कोरोनाने मृत्यूमुखी पडलेली ती 10 वर्षीय बालिका ही जिल्हय़ातील सर्वात कमी वयाची मुलगी आहे. या मुलीला इतर कोणत्या शारीरिक व्याधी अथवा इतर आजार होता का, आणि यातूनच तिचा मृत्यू ओढवला का, याची कारणे तपासण्यात येतील.