31 रोजी पारायण सोहळा
गुंजी : संगरगाळी येथील चव्हाटा मंदिरासमोर हभप संभाजी दु. पाटील यांच्या हस्तेज्ञानेश्वरी पारायणाची मुहूर्तमेढ रोवून नुकताच पारायण सोहळय़ाच्या कार्यास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. रविवार दि. 31 रोजी होणारा हा पारायण सोहळा हभप गुरु नाना वासकर महाराज यांच्या अधि÷ानाखाली होणार आहे. त्यानिमित्त हभप शिवाजी देसाई-निलावडे यांच्या हस्ते सकाळी पोथी स्थापना व रात्री कीर्तन, हभप शिगेहळ्ळी खानापूर यांचे प्रवचन, सोमवार दि. 1 फेब्रुवारी रोजी हभप कृष्णमूर्ती बोंगाळे-हलकर्णी यांचे कालाकीर्तन होऊन दुपारी महाप्रसादाने पारायण सोहळय़ाची सांगता होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.