प्रतिनिधी / सांगली
मुंबई भाजपने आपली पुणे पदवीधर विधानपरिषदेची उमेदवारी कडेपूरचे संग्रामसिंग देशमुख यांना जाहीर केली. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. लोकप्रिय व तडाखेबाज असा त्यांचा लौकिक आहे.
नागपूर पदवीधर मधून संदीप जोशी, औरंगाबाद पदवीधर मधून शिरीष बोरालकर तर अमरावती शिक्षक मतदारसंघात नितीन धांडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रभारी सचिन अरण सिंह यांनी ही घोषणा केली.