प्रतिनिधी / बेळगाव
संघाचे जेष्ठ प्रचारक श्री. बाबुराव देसाई (वय ९७) यांचे शुक्रवार दि. २२ रोजी बेंगळुर येथे दुःखद निधन झाले. श्री बाबुराव देसाई हे मूळचे सावंतवाडीचे. पदवी परीक्षा पूर्ण करून १९४२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून जवाबदारी स्वीकारली. बेळगाव, कारवार आणि धारवाड चे जिल्हा संघ प्रचारक नंतर १९८६ पासून विश्व हिंदू परिषद मध्ये जवाबदारी स्वीकारली. त्यांच्या पासून खूप कार्यकर्ते निर्माण झाले.ते गेल्या दोन वर्षांपासून बेंगळुर येथे वास्तव्यात होते. शुक्रवारी आजारी असल्या कारणाने त्यांना बेंगळुरू येथील एका इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.