प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर व सांगली जिह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून दिर्घकाळ कर्तव्य बजावलेले कर्तव्यदक्ष अधिकारी संजय शिंदे यांची रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. शिंदे पुढील आठवडÎात पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील अपर जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. त्या ठिकाणी शिंदे यांची नियुक्ती झाली असून यापूर्वी त्यांनी कोल्हापूर, सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तत्पूर्वी कोल्हापूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पुरवठा विभागाला चांगली शिस्त लावली. कोरोना महामारीच्या काळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समन्वय म्हणून त्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. या कालावधीत कोरोना वॉर रूम यशस्वी करण्यात त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांची नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती झाली आहे.