प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्य प्रशासनातील महसूल सचिव संजय कुमार (आयएएस) यांची दिल्लीत बदली झाली आहे. काल मंगळवारी सचिवालयातील त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱयांनी त्यांना निरोप दिला. यावेळी संजय कुमार यांच्या स्वीय सहायक सचिव सौ. सिया नितीन आरोसकर व कुमार यांचे जवळचे कर्मचारी सतिश खांडेपारकर व अन्य सहकारी उपस्थित होते.
गेले 28 महिने गोवा सरकारच्या महसूल विभागात त्यांनी चांगले कार्य केले आहे. भू नकाशांबरोबरच अन्य बरेच चांगले निर्णय त्यांनी घेतले आहेत. जमीन खरेदी करताना ‘ऑन द स्पॉट म्युटेशन’ करुन देण्याची व्यवस्था म्हणजे संजय कुमार यांची गोव्याला मोठी उपलब्धी आहे. त्याशिवाय सध्या अडकून पडलेले भूमी अधिकारीणीबाबतही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. ही बदली त्यांनी स्वतःहून मागून घेतली होती.