प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुका खोतोडा पंचायतीच्या सरपंचपदी संतोष गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायतीचे सरपंच राजेश पर्येकर यांची सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते. या पदावर नवीन सरपंच निवडीसाठी आज निवडणूक घेण्यात आली.
संतोष गावकर यांचा एकमेव अर्ज सादर झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱयांनी केली. यावेळी सर्व पंच सभासद उपस्थित होते. यात राजेश पर्येकर, भारत नाईक, शारदा हरिजन,
प्रतिक्षा च्यारी, यांची उपस्थिती होती. या पंचायतीचे एकूण पंच सभासद संख्या सात आहे मात्र ओमप्रकाश बर्वे यांचे निधन झाल्यामुळे ही संख्या आता सहा झाली आहे.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संतोष गावकर यांनी सांगितले की पंचायतीच्या उर्वरित काळासाठी सरपंच म्हणून सर्वांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करण्याचा विचार असल्याचे सांगितले. यापूर्वी नागरिकांनी पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी पंच सभासदांना चांगल्या प्रकारचे सहकार्य केले आहे .येणाऱया काळात अशा प्रकारचे सहकार्य करून सर्वांगीण विकास साधण्यासाठी पंचायत मंडळ कटाक्षाने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले .आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांच्या आशीर्वादाने पंचायतीत वेगवेगळय़ा प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवून विकास कामांवर भर देण्याचे आश्वासन संतोष गावकर यांनी दिले आहे.
यावेळी नगरगाव जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे उपस्थित होत्या.