धि गोवा हिंदू असोशिएशनच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा
प्रतिनिधी /पणजी
धि गोवा हिंदू असोशिएशन या मुंबईस्थित गोमंतकीय संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱया वार्षिक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आली. यामध्ये सातत्यपूर्ण लिखाणासाठीचा अ.ना. म्हांब्रो पुरस्कार गोमंतकीय कोंकणी युवा लेखिका संपदा कुंकळकार यांना जाहीर झाला आहे. 15 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे संस्थेच्यावतीने कळवण्यात आले आहे.
कोंकणीमध्ये अध्यात्म, वैचारिक, चिंतनगर्भ आणि मनोविश्ल?षणात्मक विषयांवर संपदा कुंकळकार या सातत्याने लिखाण केले आहे. त्या गोवा राज्य युवा सृजन पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या आहेत.
’धि गोवा हिंदू असोशिएशन ही देशात नावाजली जाणारी साहित्य-सांस्कृतिक संस्था आहे. त्यामुळे अशा संस्थेने आपली नोंद घेणे आणि त्यांच्या परिक्षक मंडळाच्यावतीने ’अ.ना. म्हांब्रो’ पुरस्कारासाठी आपली निवड होणे हा माझ्यासाठी खूप आनंदाची आणि त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट आहे, अशा शब्दांत संपदा कुंकळकार यांनी या आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, मुंबई येथे होणाऱया धि गोवा हिंदू असो, च्या वार्षिक वर्धापन दिनाच्या सोहळय़ामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.