प्रतिनिधी / कोल्हापूर
संभाजीनगर येथे रविवारी दुपारी महानगरपालिकेच्या चार चाकी वाहनाखाली सापडून 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे. अनवी विकास कांबळे असे तिचे नाव आहे. या घटनेचे संतप्त बपदासद उमटले. नागरिकांनी वाहन चालकास मारहाण करून वाहनावर दगडफेक केली.
या बाबत आधी माहिती अशी की, शिक्षक असणारे. विकास कांबळे हे वारे वसाहत परिसरातील मूळचे रहिवाशी आहेत. ते गेली काही वर्षांपासून पचगाव येथील रायगड कॉलनी इथल्या एन टी सरनाईकनगरमध्ये कुटुंबीयांसह राहतात. रविवारी दुपारी दुपारी ते मूलगी अन्वीला घेऊन दुचाकी वरून संभाजी नगर येथे मटण खरेदी करण्यासाठी आले होते. मटण खरेदी करून घरी परतत असताना ते रेसकोर्स नाका येथे आले असता रस्त्याकडेला थांबलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाने अचानक गाडीचा दरवाजा उघडल्यामुळे तोल जावून विकास कांबळे दुचाकीवरून खाली पडली. तर तन्वी महापालिकेचा व्हॅनखाली सापडली. या मध्ये ती जागीच मृत झाली.
याची माहिती परिसरातील कांबळे यांच्या नातेवाईक समजली. संतप्त नातेवाईकांनी महापालिकेच्या गाडीची तोडफोड केली तसेच वाहन चालकास मारहाण केली. करत जखमी कांबळे आणि त्यांच्या मुलीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच अनवीचा मृत्यू झाला होता. जखमी विकास कांबळे यांच्या दोन्ही हाताला मार लागला असून त्यांच्यावर सीपीआर येथे उपचार सुरु आहेत.
या अपघातानंतर संभाजीनगर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवले आणि वाहतूक सुरळीत केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह पोलीसाकडून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे.