वृत्तसंस्था/ दुबई
सोमवारी येथे झालेल्या दुसऱया आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात संयुक्त अरब अमिरातने भारताचा 6-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
भारतीय संघाने या दौऱयात झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ओमानला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. सोमवारच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा खेळ भारताच्या तुलनेत सर्वच विभागात दर्जेदार झाला. भारताच्या फुटबॉलपटूंना या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. संयुक्त अरब अमिरात संघातील हुकमी स्ट्रायकर अली मेबखोतने शानदार हॅट्ट्रीक साधर्लीं. अलीने या सामन्यात 12 व्या, 32 व्या आणि 60 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदविले. संयुक्त अरब अमिरात संघातील लिमाने 71 व्या आणि 84 व्या मिनिटाला दोन गोल केले. खलील इब्राहीमने 64 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला. फिफाच्या मानांकन यादीत संयुक्त अरब अमिरात 74 व्या तर भारत 104 व्या स्थानावर आहे. 2022 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा आणि 2023 च्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी हे मित्रत्वाचे सामने सरावासाठी आयोजित केले आहेत.