वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा जागतिक दर्जाचा फलंदाज एबी डिव्हीलीयर्स यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातून सर्वोत्तम संयुक्त वनडे संघाची निवड करताना महिंद्र सिंग धोनीकडे कर्णधारपद सोपविले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. 2011 साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसीची वनडे क्रिकेट स्पर्धा तसेच आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. धोनी हा जगातील सर्वोत्तम कुशल कर्णधार असल्याचे वैयक्तिक मत डिव्हीलीयर्सने व्यक्त केले आहे. धोनी हा जगातील ‘कूल कॅप्टन’ म्हणून ओळखला जातो. जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये धोनीचा नेहमी आदर केला जातो. संघातील प्रत्येक खेळाडूंवर त्याने दाखविलेला विश्वास संघाच्या यशाला मदत करणारा ठरतो, असेही त्याने म्हटले आहे.
कोरोनाग्रस्तांसाठी रॉयल चॅलेंजर्स खेळाडूनी आपल्या क्रिकेट साहित्याचा लिलाव करण्याचे ठरविले असून कोहली आणि डिव्हिलीयर्स यांनी 2016 च्या आयपीएल स्पर्धेत वापरलेल्या बॅट, ग्लोव्हज तसेच टीशर्टस् यांचा लिलाव केला जाणार आहे. या लिलावातून जमलेला निधी कोरोनाग्रस्तांसाठी दिला जाणार आहे.
संयुक्त विश्व संघामध्ये धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, यजुवेंद्र चहल, एबी डिव्हलीयर्स, कॅलीस, स्टीन, बुमराह आणि रेबाडा यांचा समावेश आहे.