प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील आणखी 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होत चालली असून सध्या 259 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने रविवारी रात्री ही माहिती दिली आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 946 च्या घरात असून 25 हजार 343 जणांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. तर 342 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अद्याप 4 हजार 572 अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ातील 3 लाख 23 हजार 23 जणांची आजवर स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 2 लाख 90 हजार 712 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 39 हजार 48 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
रविवारी अंजनेयनगर, रामतीर्थनगर, कॅम्प, कणबर्गी, मुचंडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बेळगाव शहर व तालुक्मयातील पाच जणांचा यामध्ये समावेश आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जनजागृतीबरोबरच आवश्यक तयारी करण्यास सुरुवात केली आहे.