शिरोळ / प्रतिनिधी
येथील डोळ्याच्या व छातीच्या आजारास कंटाळून वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. अंजना विलास दाभाडे (वय 70) असे वृद्धेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, कदम गल्लीत राहणाऱ्या अंजना दाभाडे यांना अनेक वर्षापासून डोळ्याचा व छातीचा आजार होता. सततच्या आजारास कंटाळून त्यांनी आज (दि. 27) दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली. याबाबत विनायक धोंडीराम दाभाडे यांनी पोलिसात वर्दी दिली असून अधिक तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.