प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील सदरबझार परिसरातील जेसीओ हौसिंग सोसायटीतील एका घरातून कपाटात ठेवलेले 50 हजार रुपयांचे अडीच तोळय़ांचे मंगळसूत्र अज्ञात चोरटय़ाने लंपास केले. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याबाबत निर्मल चंद्रकांत गांधी (वय 70 रा. जेसीओ हौसिंग सोसायटी, सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 11 रोजी ही चोरीची घटना घडली आहे. गांधी यांनी कपाट ठेवलेले 50 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे मणीमंगळसुत्र चोरटय़ाने चोरुन नेले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर गांधी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असून अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा पुढील तपास पोलीस नाईक मोहिते करत आहेत. दरम्यान, सातारा शहर परिसरात दुचाकी चोऱया, घरफोडी, पानपट्टी, दुकान फोडून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होवू लागली आहे. यासाठी पेट्रालिंग व रात्रगस्त वाढवण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.