बेळगाव : चिनी कोविडमुळे बुलक तसेच चित्रलोकचे कार्यक्रम सध्या ई-स्वरुपात म्हणजे ऑडिओ-व्हिडिओद्वारे सुरू आहेत. हे आधुनिक तंत्रज्ञान अधिक चांगल्याप्रकारे वापरता यावे व सदस्यांनी आपापले व्हिडिओ व्यवस्थित बनवावेत, यासाठी बुलकतर्फे रविवार दि. 18 रोजी मोबाईलद्वारे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये पंचवीसहून अधिक युवकांसह ज्ये÷ सदस्यांनीही आवडीने भाग घेतला. लोकमान्य ग्रंथालयाच्या सभागृहात कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करत हा कार्यक्रम पार पडला. बुलकचे सदस्य व सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले, रवी पाटील आणि युवराज पाटील या तंत्रस्नेहींनी वेगवेगळे ऍप्स वापरून, परिणामकारक व्हिडिओ कसे बनवायचे याच्या प्रॅक्टीकलसह जवळ जवळ अडीच तास प्रशिक्षण दिले. निखिल नरगुंदकर यांनी स्वागत व ओळख करून दिली. किशोर काकडे यांनी डिजिटल इंडियाकडे बुलकचे हे पाऊल पडत असून आधुनिक तंत्रज्ञान सर्वांनीच आत्मसात करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. अशोक याळगी यांनी वक्त्यांना पुस्तके भेट देऊन स्वागत करून आभार मानले. कार्यशाळेत ज्ये÷ सदस्यांनी विद्यार्थ्यांप्रमाणे कुतूहल दाखवित भाग घेतला.
Previous Articleमनपा कर्मचाऱयांनी वाचवला वासराचा जीव
Next Article प्रगतशील लेखक संघ, एल्गार परिषदेतर्फे कार्यक्रम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.