लॉर्ड्स, रिव्हरसाईड ग्राऊंडवर सामन्यांचे आयोजन
वृत्तसंस्था/ लंडन
येत्या उन्हाळय़ात दक्षिण आफ्रिका व भारताचे महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौरा करणार असल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) मंगळवारी जाहीर केले. रिव्हरसाईड ग्राऊंड व लॉर्ड्सवर यातील सामने होणार आहेत.
सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका महिला संघ जून-जुलैमध्ये इंग्लंड दौऱयावर येणार असून यात एक कसोटी, तीन वनडे व तीन टी-20 सामने ते इंग्लंडविरुद्ध खेळतीत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व द हंड्रेड स्पर्धा झाल्यानंतर भारतीय महिला संघ इंग्लंड दौरा करणार असून हा संघ यजमानांविरुद्ध तीन टी-20, तीन वनडे सामने खेळणार आहे. यातील शेवटचा वनडे सामना 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्सवर खेळविण्यात येणार आहे.
‘जगातील दोन सर्वोत्तम संघांविरुद्ध मालिकांचे आयोजन करून आम्ही रोमांचित झालो आहे. महिला संघांसाठी हे वर्षही भरगच्च कार्यक्रमाचे असणार आहे,’ असे महिला क्रिकेटच्या व्यवस्थापकीय संचालिका क्लेअर कॉनर म्हणाल्या. ‘भारत व दक्षिण आफ्रिका संघांचे सामने खेळविण्यासाठी यावेळी लॉर्ड्स व रिव्हरसाईड ग्राऊंडचाही समावेश करू शकलो, ही आनंदाची बाब आहे. या दोन मोठय़ा मैदानावर खेळताना महिला क्रिकेटपटूंना रोमांचकतेचा अनुभव येईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत महिला क्रिकेट पोहोचावे, असा आमचा प्रयत्न आहे, असेही त्या म्हणाल्या.
भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा कार्यक्रम
टी-20 मालिका
10 सप्टेंबर इंग्लंड-भारत रिव्हरसाईड ग्राऊंड, डरहॅम सायं. 7
13 सप्टेंबर इंग्लंड-भारत इन्कोरा कौंटी मैदान, डर्बी सायं.6.30
15 सप्टेंबर इंग्लंड-भारत काऊंटी ग्राऊंड ब्रिस्टॉल सायं.6.30
वनडे मालिका
18 सप्टेंबर इंग्लंड-भारत सेंट्रल कौंटी ग्राऊंड, होव सकाळी 11
21 सप्टेंबर इंग्लंड-भारत स्पिटफायर ग्राऊंड, कँटरबरी दुपारी 1
24 सप्टेंबर इंग्लंड-भारत लॉर्ड्स, लंडन सकाळी 11.