-विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांचा आरोप
प्रतिनिधी/कोल्हापूर
विस्तारीकरणाचा ठरावास विरोध होईल या धास्तीने सभासदांचा आवाज म्युट करुन विषय मंजूर करुन घेतला. मंत्र्यांच्या सूचनेवरुन हे कृत्य केले असा आरोप विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेनंतर केला कोरोनाचे सावट असतानाही प्रचार ऑफलाईन करून सर्वसाधारण सभा ऑनलाईन का घेतली. अशी विचारणाही त्यांनी केली. सभेनंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, नवीन प्रकल्पांसाठी जागा खरेदीसाठी जी 130 कोटींची रक्कम संघाकडून अदा करण्यात येणार होती, ती रक्कम सुध्दा कर्ज स्वरूपात देण्याची तयारी एनडीडीबीने दाखवली आहे हे मागील सत्ताधाऱयांचीच पुण्याईच आहे. चार महिन्यातील कारभाराने परिस्थीत सुधारली नाही. अमाच्या पत्रकार परिषदेनंतर शेकडो कोटी रूपये एकत्रीत खर्च करण्याचा निर्णय बदलून टप्या-टप्याने खर्चाचा प्रस्ताव मांडला हा आमच्या लढयाचा विजय आहे. पण तरीही एवढयावर न थांबता या सर्व खरेदी प्रकरणात जिथे गोंधळ वाटेल तिथे आम्ही नक्की प्रश्न उपस्थित करू अशा इशारा महाडिक यांनी दिला. भाकरी परतवणाऱया `कर्तृत्ववान’ माणसाचा संपूर्ण जीवनप्रवास समजण्यासाठी एखादी डॉक्युमेंटरी असली पाहिजे यासाठी मी नक्की वेळ काढून पुढाकार घेईन. असे विश्वास पाटील असे सांगत संचालकांच्या पत्राना उत्तरे दिली जात नाहीत तिथे सभासदांचे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थि केला.