समांतर वेबसिरीजच्या पहिल्या सिझनच्या अभूतपूर्व यशानंतर वेबसिरीजच्या दुसऱया सिझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. या सिरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे जोरदार सुरू आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते. या वेब सीरीजच्या दुसऱया पर्वामध्ये स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसले असतानाच निर्मात्यांनी मात्र दुसऱया सिझनमध्ये बऱयाच नाविन्यपूर्ण गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
समांतरच्या पहिल्या सिझनला अर्थात पर्वाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतफत्वाखालील जीसिम्सची निर्मिती असलेल्या समांतरच्या पहिल्या सिझनला तब्बल 200 दशलक्ष हिट्स मिळाले होते. सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज भूमिकेत आहेत. स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्याच्या चाहत्यांना ती खूप आवडली होती. दुसऱया पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आदी कलाकार सहभागी झाले होते. दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर यावेळी निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदारसुद्धा हजर होते. या सर्वांनी दुसरे पर्व लवकरच दाखल करत असल्याचे म्हटले आणि ते पहिल्या सिझनप्रमाणेच अत्यंत लोकप्रिय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत.
सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो. स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या महाभारतमध्ये (1988) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या कृष्ण (1993) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती.