पिंपरी चिंचवड/ प्रतिनिधी
राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार असा वक्तव्य केलं आहे. यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एकेरी उल्लेख करत, ‘तुला तुरुंगात टाकल्याशिवाय शांत राहणार नाही’ असं वक्तव्य केलंय. आर्यन खान (aryan khan) प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) एका कार्यक्रमात बोलताना नवाब मलिक यांनी वानकेडेंवर आरोप करत एनसीबीच्या कारवाईबद्दल गंभीर आरोप केलेत.
नवाब मलिक यांनी एनसीबी (NCB) करत असलेल्या कारवाईची प्रकरणं बोगस आहेत, त्यांना आपण लवकरच एक्सपोज करू असं सांगत नवाब मलिक यांनी वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल असं गंभीर वक्तव्य मलिक यांनी केलंय. नवाब मलिकच्या जावयाला तुरुंगात टाकताना वरून दबाव टाकणारा तुझा बाप कोण? तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी शांत राहणार नाही हे आव्हान असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.