पृथ्वीवर समुद्र हे एक असे ठिकाण आहे, जे अनंत आणि रहस्यमय गोष्टींनी भरलेले आहे. समुद्रात अनमोल रत्नांपासून अनोखे जीवजंतू राहतात, हे पाहून अत्यंत थक्क व्हायला होतो. पृथ्वीवर 80 लाखांहून जीव-जंतूंच्या प्रजाती आढळतात, यातील बहुतांश प्रजाती समुद्रातील आहेत. समुद्रात छोटय़ा-मोठय़ा जीव-जंतूंसह असंख्य प्रकारचे मासेही आढळतात. आता सोशल मीडियावर पंख असलेल्या माशाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु हा खरोखरच मासा आहे की अन्य जीव याबद्दल गोंधळ आहे. या माशाचा रंग सोनेरी असून तो अत्यंत सुंदर दिसून येत आहे.
छायाचित्रात एक व्यक्ती स्वतःच्या हातात माशासारखा दिसणार जीव पकडून आहे. या अनोख्या जीवाला दोन पंख असून त्याचा आकार माशासारखाच आहे. हा जीव पाण्यात सोडताच तो अत्यंत वेगाने माशासारखाच पोहोन पसार झाला.
हा जीव मासाच असू शकतो असे मानले जात आहे. या जीवाला दर्शविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 34 हजारांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइक देखील केले आहे.