वार्ताहर /कंग्राळी बुदुक
येथील सरकारी कंत्राटदार व शास्त्राrनगर वसाहत ग्रामस्थांच्यावतीने कोरोना महामारी काळात आजारी नागरिकांवर आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा केलेल्या डॉक्टर कोरोना योद्धय़ांचा सत्कार नुकताच पार पडला.
अध्यक्षस्थानी कलमेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन विजय पावशे होते. व्यासपीठावर कोरोना योद्धे व सत्कारमूर्ती डॉ. इम्रान अंबी, डॉ. ताबीज, डॉ. संजय पाटील, डॉ. पायल पाटील उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, नवनाथ पुजारी, दादासाहेब भदरगडे, यल्लोजी पाटील, तानाजी पाटील, उमेश पाटील, बाबू दोडमनी, ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष गजानन बिर्जे, ज्ये÷ प्रगतशील शेतकरी आप्पाजी पाटील, सरकारी कंत्राटदार हणमंत पाटील, राजू पावशे, इलेक्ट्रीक सरकारी कंत्राटदार प्रल्हाद पावशे, प्रगतशील शेतकरी गजानन पावशे, जोतिबा पवार (गौंडवाड), नारायण वाळके (काकती), शंकर कोणेरी, नारायण पाटील, मनोज कडोलकर, संदीप अष्टेकर, भाग्येश नागरदळेकर आदी उपस्थित होते.
कोरोना महामारी काळात वरील सत्कारमूर्ती कोरोना योद्धय़ांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अल्प फीमध्ये सेवा करून शेकडो रुग्णांचे जीव वाचविल्यामुळेच आम्ही त्यांच्या सत्काराचे आयोजन केल्याचे प्रास्ताविकात ग्रा. पं. माजी अध्यक्ष गजानन पाटील यांनी सांगितले.
यावेळी सरकारी कंत्राटदार शास्त्राrनगर, नागरिक व पावशे परिवारातर्फे वरील कोरोना योद्धय़ांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. इम्रान अंबी यांची कृतज्ञता
सत्काराला उद्देशून कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. इम्रान अंबी म्हणाले, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. गोरगरीब व गरजू जनतेची सेवा करणे हेच खरे पुण्याचे कार्य असून आम्ही आपले हे मानवसेवा कार्य कोरोना हद्दपार होईपर्यंत अखंड सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला वृषाली पावशे, अरुणा पावशेंसह शास्त्रीनगरमधील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रा. पं. माजी अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले. आभार प्रशांत पवार यांनी मानले.