कोरोना काळ- मानांकत न्यूझीलंड दुसऱया स्थानावर
कोराना संक्रमणाने जगातील बहुतांश देशांना प्रभावित केले आहे. या संकटामुळे लोकांचे राहणीमान आणि दिनचर्याच बदलली आहे. सरकारांनीही कठोर पावले उचलून संक्रमणावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. यादृष्टीकोनातून कुठला देश कोविडच्या काळातही वास्तव्यास योग्य आहे हे पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ब्लूमबर्गने अनेक मापदंड विचारात घेत मानांकन तयार केले असून सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे. तर न्युझीलंड दुसऱया स्थानावर राहिला आहे. सिंगापूरला पहिले स्थान मिळवून देण्यात तेथील लसीकरण कार्यक्रमाची प्रमुख भूमिका आहे. तर न्यूझीलंडमध्ये लसीकरणाचा वेग मंद आहे. सद्यस्थितीत भारताचे मानांकनही खालावले आहे. सिंगापूरने कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यंत वेगाने आणि कठोरपणे लसीकरण मोहीम चालविली असल्याने तेथील संक्रमण बऱयाचअंशी थांबले आहे. सिंगापूरमध्ये अद्याप अनेक बंधने आहेत. स्थलांतरित मजुरांना कोविड चाचणीनंतरच शहरात प्रवेश दिला जात आहे. सध्या पूर्ण भागात संक्रमणाची प्रकरणे शून्य आहेत. नागरिकांना हिंडण्याची सूट असली तरीही नियमांचे पालन अनिवार्य आहे. ते लाइव्ह कॉन्सर्ट तसेच रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकतात. 60 लाख लोकसंख्या असलेल्या सिंगापूरमध्ये 15 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत.