सेन्सेक्समध्ये 254 तर निफ्टीत 74 अंकांची वाढ, सन फार्मा नफ्यात
वृत्तसंस्था / मुंबई
अर्थव्यवस्थेतील सकारात्मक वातावरण, जागतिक शेअरबाजारांचा प्रभाव आणि खरेदीतील वाढ यांच्या जोरावर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये बुधवारी दिवसअखेर 254.03 अंकांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीतही 76.40 अंकांचा वधार झाला आहे. दिवसअखेर हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 51,279.51 आणि 15,174.80 अंकांवर बंद झाले. सेन्सेक्समध्ये गेल्या तीन दिवसांत सरासरी 1.73 टक्के तर निफ्टीमध्ये 1.85 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
सेन्सेक्सचा विचार करता बजाज फायनान्स कंपनीच्या समभागांमध्ये सर्वाधिक 2.34 टक्क्मयांची मूल्यवाढ झाली. त्याखालोखाल सन फार्मा, टेक महिंद्रा,
ऍक्सिस बँक, बजाज ऑटो आणि इन्फोसिस यांच्या समभाग दरांमध्ये वधार पहावयास मिळाला. दुसऱया बाजूला ओएनजीसी, कोटक बँक, आयटीसी, पॉवर ग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती कंपन्यांच्या समभागांची घसरण झाली. 30 महत्त्वपूर्ण सेन्सेक्स समभागांपैकी 23 समभागांचा दर वाढला आहे.
धातू निर्मिती, माहिती-तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, पायाभूत सामग्री आणि ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रामध्ये तेजी दिसून आली. वाहननिर्मिती क्षेत्राचा निर्देशांकही 0.82 टक्क्मयांनी वधारला. तथापि, तेल आणि वायू, ऊर्जा आणि वीज आदी क्षेत्रांच्या निर्देशांकामध्ये घट झाली. स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्ज कॅप कंपन्यांनी तेजीच्या संदर्भात बेंचमार्क कंपन्यांना मागे टाकल्याचेही दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधन तेलाचे दर 0.59 टक्के घसरून ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 67 डॉलर प्रतिबॅरलवर स्थिरावला.
जागतिक बाजारांमध्ये घसरण तेजी होती. जागतिक शेअरबाजारांमध्ये शांघाई आणि सेऊल येथील शेअरबाजार काहीशा मंदीसह बंद झाले. हाँगकाँग आणि टोकियो शेअरबाजारांनी तेजी नोंद केल्यामुळे जागतिक शेअरबाजारांमध्ये बऱयापैकी सकारात्मकता दिसून आली.