शुक्रवारी 28 नवे रुग्ण : सक्रिय रुग्णांची संख्या 211 वर
प्रतिनिधी / बेळगाव
सलग दुसऱया दिवशी शुक्रवारी कोरोनाचा आणखी एक बळी गेला आहे. रायबाग तालुक्मयातील एका 61 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. आणखी 28 नवे रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही संख्या 211 वर पोहोचली आहे.
गुरुवारी चिकोडी तालुक्मयातील एका 62 वषीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शुक्रवारी रायबाग तालुक्मयातील 61 वषीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील मृतांचा आकडा 344 वर पोहोचला आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली आहे.
गणेशपूर, मुचंडी, बिम्स् हॉस्टेल, टिळकवाडी, महांतेशनगर, द्वारकानगर, अजमनगर, क्लब रोड परिसरात पॉझिटिक्ह रुग्ण आढळून आले आहेत. अंजनेयनगर येथील तिघा जणांचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. याबरोबरच रामदुर्ग, अथणी, यमकनमर्डी शिरहट्टी, कपलगुद्दी, घटप्रभा, ममदापूर, केरुर, चिक्कनंदी, बुदिहाळ, हुली, खानापूर परिसरातही पॉझिटिक्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 294 वर पोहोचली असून त्यापैकी 26 हजार 736 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 12 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 211 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 29 हजार 219 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 3 हजार 661 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.