बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचा प्रसार वेगाने होत चालला आहे. राज्यात कोरोनाच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात २४ तासात ४ हजाराहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात २४ तासात १८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात दररोज री कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने सरकार कडक नियमावली राबवित आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे म्हणत आहे.
राज्यात सलग काही दिवस कोरोनाची संख्या वाढत आहे. बुधवारी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४ हजाराच्या वर गेली होती. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या ४ हजारावर गेली आहे. राज्यात दिवसागणिक कोरोनाचा वेग वाढतच आहे. राज्यात कोरोनाचा वेग वाढल्याने गुरुवारी ४,२३४ बाधित रुग्णांची भर पडली.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात गुरुवारी ४,२३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हंटले आहे. तर, राज्यातील विविध जिल्ह्यातून १,५९९ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. गुरुवारी कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत १२,५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वेग वाढत आहे. बेंगळूरमध्ये रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात प्रशासनाने अनेक कार्यक्रमांवर बंदी आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कमही वाढवली आहे. तसेच राज्यात कडक नियमावली लागू केली आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात २,९०६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ७१९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,६३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.